सचिन तेंडुलकरचा मुलगा (अर्जुन तेंडुलकर) लग्न बंधनात–
मुंबईतील वरळी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा विवाह पार पडला खेळाडूंपासून नेते मंडळींपर्यंत सर्वजणांनी लग्नाला हजेरी लावली.
आशिष नेहरा, श्रेयस अय्यर,शायना एनसी, झहीर खान,अजित आगरकर, सुप्रिया सुळे, राज ठाकरे, सुनील गावस्कर, शंकर महादेवन, अजिंक्य रहाणे, अनिल कुंबळे, अजित आगरकर, सुप्रिया सुळे, राज ठाकरे, सुनील गावस्कर, असे सर्व सेलिब्रेटी लग्नात भेट देण्यासाठी आले होते.
सानिया चंडोक कोण आहे?
सानिया चांडोक ही एक भारतीय उद्योजिका आणि पात्र पशुवैद्यकीय तंत्रज्ञ आहे.ती मूळची मुंबईची रहिवासी आहे आणि एका प्रसिद्ध व्यावसायिक कुटुंबातून आली आहे. सानियाने स्वतःच्या मेहनतीने उद्योजक म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. तिला प्राण्यांबद्दल खूप प्रेम आहे आणि प्राणी कल्याणाच्या कामातही तिचा विशेष आवड आहे.
सोप्या भाषेत सांगायचे तर, सानिया चांडोक ही यशस्वी उद्योजिका असून प्राण्यांची काळजी घेण्याबद्दल तिची खास आवड आहे.
भारतीय क्रिकेटचा मास्टर ब्लास्टरस मानला जाणारा Sachin Tendulkar आजही लाखो लोकांच्या हृदयात त्यांनी विशेष स्थान निर्माण केलेले आहे. त्याच्या खेळाइतकीच लोकांना त्याच्या वैयक्तिक आयुष्याचीही उत्सुकता लागलेली असते. आताच त्याच्या मुलाच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे.
सचिन तेंडुलकर यांचा मुलगा Arjun Tendulkar हा सुद्धा क्रिकेटच्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करत आहे. यातच त्याच्या लग्नाची बातमी समोर आल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लग्न हा क्षण प्रत्येक कुटुंबासाठी अत्यंत भावनिक आणि आनंदाचा क्षण असतो, आणि तेंडुलकर कुटुंबासाठीही हा तसाच खास क्षण ठरला आहे.सचिन तेंडुलकर यांचा मुलगा Arjun Tendulkar याच्या लग्नात साधेपणात झालेला लग्न सोहळा, साध्या पण अत्यंत सुंदर पद्धतीने पार पडल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जवळचे नातेवाईक, मित्र आणि काही खास सेलिब्रेटी व्यक्तींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. तेंडुलकर कुटुंब नेहमीच साधेपणा आणि संस्कारांसाठी ओळखले जाते, त्यामुळे लग्नातही त्यांचे संस्कार आणि परंपरेचा वारसा दिसून आल्याचे म्हटले जाते.
तेंडुलकर कुटुंबीयांच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सचिन तेंडुलकरचे चाहते भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात आहेत. सचिन तेंडुलकर यांच्या मुलाच्या लग्नाची बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. खूप जणांनी या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देत तेंडुलकर कुटुंबाच्या आनंदात सहभाग घेत शुभेच्छा दिल्या आहे.सुरुवातीची नवीन पायरी म्हणजे लग्न आणि आयुष्याच्या नवीन प्रवासाची सुरुवात. क्रिकेटसारख्या बिझीकरिअरमध्येही वैयक्तिक आयुष्याला महत्त्व देणे खूप गरजेचे असते. या नवीन टप्प्यात अर्जुन तेंडुलकरला कुटुंबाचा आणि चाहत्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल,अशी अपेक्षा आहे.हळदी समारंभ आणि मेहंदी समारंभ सोहळा अगदी परंपरा संस्कृती पद्धतीने पार पडला. या सोहळ्याचे खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या विवाह सोहळ्याचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.सकाळी 12 च्या दरम्यान, हा सोहळा पार पडला असल्याच बोल जातं.या लग्न सोहळ्याच्या खासदिनी सानिया चंडोकने लाल रंगाची साडी नेसली होती. या साडीमध्ये सानिया चंडोक अगदी सुरेख दिसत होती तिने
तिचे केस मोकळे सोडलेले होते.अर्जुन तेंडुलकरनेही पारंपारिक पोशाख परिधान केला होता लाल रंगाची शेरवानी त्यांनी परिधान केली होती.सचिन यांनी सिल्वर ग्रे रंगाची शेरवानी घातली होती असे दिसून आले .तसेच सचिन तेंडुलकर ची पत्नी अंजली यांनी गुलाबी रंगाली साडी नेसली होती. दोघे खूप खुश दिसत होते. अमिताभ बच्चन आणि शाहरुख खाननेही हजेरी लावली होती.तेंडुलकर कुटुंब नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी माहिती सार्वजनिक करत नाही त्यामुळे त्या माहिती होण्यासाठी थोडा वेळ लागतो.
Also Read This-AI म्हणजे काय? सोप्या मराठी भाषेत संपूर्ण माहिती (२०२६)
सचिन तेंडुलकरचे नाव आजही भारतीय क्रिकेटच्या इतिहासा मधील सर्वात मोठ्या नावांपैकी एक आहे.
त्याने आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीत 100 आंतरराष्ट्रीय शतके, हजारो धावा आणि असंख्य विक्रम केले आहेत.
सचिन तेंडुलकर हा भारतीय क्रिकेटमधील एक अमूल्य व्यक्ती आहे. त्याच्या खेळण्याने संपूर्ण देशाला अभिमान वाटायला लावले आहे.
तसेच सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या क्रिकेटमध्ये आपली वाट तयार करत आहे आणि चाहत्यांचे लक्ष त्याच्याकडेही आहे. त्याच्या आयुष्यातील कोणतीही महत्त्वाची घटना
जसे की लग्न ही चाहत्यांसाठी उत्सुकतेचा विषय ठरते.
तेंडुलकर कुटुंबातील आनंदाचे क्षण हे केवळ त्या कुटुंबापुरते मर्यादित राहत नाहीत, तर संपूर्ण देशातील चाहत्यांना आनंद देत आहे.